राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले

Foto
सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलं असून अमेरिकेला याचा सर्वाधिक फटकादेखील बसला आहे. असे असले  तरी अमेरिकेत मात्र  राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीचं बिगुल वाजले आहे. 
निवडणुकीसाठी पहिली डिबेट 29 सप्टेंबर रोजी ओहियोमध्ये पार पडणार आहे. कमिशन ऑफ प्रेसिडेन्शिअल डिबेट्सने सोमवारी याबाबत माहिती दिली. क्लिव्हलँडच्या केस वेस्टर्न विद्यापीठ आणि क्लिव्हलँड क्लिनिक ही डिबेट होस्ट करणार आहेत, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. 29 सप्टेंबर रोजी हेल्थ एज्युकेशन कँपसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेट्सचे उमेदवार  जो बायडेन यांच्यादरम्यान थेट डिबेट होणार आहे. दोन्ही नेते 15 ऑक्टोबर रोजी फ्लोरिडातील मायामीमध्ये पुन्हा एकमेंकासमोर येणार आहे. तर तिसरी डिबेट 22 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
उप-राष्ट्राध्यक्षपदासाठी 7 ऑक्टोबर रोजी पहिली डिबेट होणार आहे. सॉल्ट लेक सिटी विद्यापीठात पार पडणार्‍या या डिबेटमध्ये उप-राष्ट्राध्यक्ष माईक पेंस हे डेमोक्रेट्रिक पक्षाच्या उमेदवारासमोर येणार आहे. सध्या डेमोक्रेटिक पक्षाकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. या सर्व डिबेट 90 मिनिटांच्या असतील. तसंच या रात्री 9 ते 10.30 दरम्यान होणार आहे. या सर्व डिबेट्सचे  अमेरिकेत थेट प्रक्षेपणही करण्यात येणार आहे.
बायडेन यांची आघाडी
आठवडाभरापूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात बायडेन यांनी बाजी मारल्याचं दिसून आलं होतं.  वॉशिंग्टन येथील यांच्या सर्वेक्षणाची माहिती 19 जुलै रोजी जारी करण्यात आली होती. यानुसार ट्रम्प यांना 44 तर बायडेन यांना 54 टक्के लोकांचं समर्थन असल्याचं समोर आलं होतं. सलग पाचव्या राष्ट्रीय सर्वेक्षणात बायडेन यांनी बाजी मारल्याचं दिसून आलं होतं.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker